सावळ्या मनी सावळी ती
पूजाया मनाच्या राउळी ती
गाली ओघळणारा आसू ती
भरून येणारा हुंदका ती
अधरा चढवली मदिरा ती
होश हि माझी बेहोशी हि ती
ओंजळी जपली पाकळी ती
बांधली मला जी साखळी ती
मन माझं खुळ उरलया थोडं
तिच्या माग माग उडंलया सार
साखरझोप तीच माझी
सोनेरी माझी पहाट
कातरवेळ तीच माझी
माझी दिवेलागण
दूर कधी माझ्या जवळी ती
ओळख माझी वेगळी ती
हलकी झुळूक सुनामी हि ती
ख्याती हि माझी बदनामी हि ती
कट्यार माझी कलम ही ती
जखम माझी मलम ही ती
सावळ्या मणी सावळी ती
पूजाया मनाच्या राउळी ती