आई कुणा म्हणू मी, तुजवीण सांग आई
इतुकेच सांगण्याला येशील का ग आई
आई कुणा म्हणू मी
तोडीत ना फुलाला वेलीस्वये कधीही
सोडून तू मुलाला गेलीस का ग आई आई आ आ आई
रागावण्या तुलाही मजवीण बाळ नाही
बाळाविना तुलाही कोणी म्हणेल आई आई आ आ आई
चुकतो असेल मी गे म्हणतो तुला मी आई
चुकलीस तू परी का होऊन माझी आई आई आ आ आई