चंदनाच्या पलंगी शेज मखमली लाल
दोन उशा रेशमी गरम लोकरी शाल
पर झोप नाही आली जागरण झालं काल
अहो रंग महाली ऊब असून का काटा फुलतोय नवा
बाई बाई बाई ग बाई बाई झोंबतो गारवा
ग बाई बाई झोंबतो गारवा
ग बाई बाई झोंबतो गारवा
ग बाई बाई झोंबतो गारवा हाआ
झोंबतो गारवा खरंच हिला झोंबतो गारवा
अंग नाजूक ग मला रुतली उशी हिला रुतली उशी
आली जांभई ग निजले बदलून कुशी हीन बदलून कुशी
खिडकीमधुनी खुणवत होता
खिडकीमधुनी खुणवत होता चवथीचा चांदवा
ग बाई बाई चवथीचा चांदवा
ग बाई बाई चवथीचा चांदवा हाआ
झोंबतो गारवा खरंच हिला झोंबतो गारवा
आज आला तुम्ही माझी केली कदर हिची झाली कदर
झाली नजरानजर घेते लाजून पदर हिने घेतला पदर
खुशाल यावं जवळ घ्यावं
खुशाल यावं जवळ घ्यावं धरून हात आडवा
ग बाई बाई धरून हात आडवा
ग बाई बाई धरून हात आडवा हाआ
झोंबतो गारवा खरंच हिला झोंबतो गारवा
हा आ ग बाई बाई झोंबतो गारवा
ग बाई बाई झोंबतो गारवा हा आ