नाविका चल तेथे दरवळते जेथे चांदणे
नाविका चल तेथे दरवळते जेथे चांदणे
नाविका
जिथे उन्हाचा स्पर्शही लोभस
सरगम गुंजत झरतो पाऊस
फुलासारखे तिथे फुलावे
तुझे नि माझे जिणे
नाविका चल तेथे दरवळते जेथे चांदणे
नाविका
मखमालीची जिथली हिरवळ
मुळी न सुकते सुमनांचे दळ
अवकाशाच्या तारा छेडी वारा मंदपणे
नाविका चल तेथे दरवळते जेथे चांदणे
नाविका
प्रिय नयनातील भाव वाचता
चुकून दिसावा मोर नाचता
दूरदेशीचे बुलबुल यावे कधी मधी पाहुणे
नाविका चल तेथे दरवळते जेथे चांदणे
नाविका