[ Featuring ]
नाही उरले तुझ्या माझ्यात अंतर
झालो विठूमय अंतरबाह्य विठ्ठल
हो नाही उरले तुझ्या माझ्यात अंतर
झालो विठूमय अंतरबाह्य विठ्ठल
तुझ्या नामापुढं माझं सारं मी पन सरल
असं नात भक्तीच तुझ माझ जडलं
सारं तुझ्याच स्वाधीन माझ कर सांभाळ
हे बा विठ्ठल
नाही उरले तुझ्या माझ्यात अंतर
ताक धी न ताक ताक ताक ताक ताक धीक धा
ताक धी न ताक ताक ताक धी न धा
फार अवघड बिकट तुझ्या पालखीची वाट
झाली पायाची चाळन चढ चटूनिया घाट
तुझ्या वारीचा महिमा तुच जाणे गा विठ्ठला
जो ही करेल ही वारीत्यास मोक्ष गा लाभला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल (ताक ताक ताक ताक ताक धीक धा )
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल (ताक ताक ताक ताक ताक धीक धा )
इथे थोर ना लहान सारे माऊली समान
एकामेका चरणाशी सारे घाली लोटांगणं
ऐसा वैष्णवांचा मेळा गळा तुळशीची माळा
होता नामाचा गजर हसतोया तो सावळा
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल (ताक ताक ताक ताक ताक धीक धा )
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल (ताक ताक ताक ताक ताक धीक धा )
वारी चुकली नाही आजवरी विठ्ठला
कधी पावशील ह्याचा जीवा घोर लागला
हो हो हो वारी चुकली नाही आजवरी विठ्ठला
कधी पावशील ह्याचा जीवा घोर लागला
किती जन्माचे भोग सरताही सरेना
ऐसा सासुरवास काही केल्या संपेना
ऐक माझी आर्त हाक घालितो गा साकड
हे बा विठ्ठल
नाही उरले तुझ्या माझ्यात अंतर
धीन धीन ताकीन ताकीन
ताधीन ताकीन ता ता ता
ऐसा चंद्रभागेतीरी आषाढीचा हा सोहळा
देवळाच्या आत उभा आतुरला तो सावळा
टाळ मृदुंगाच्या संगे गजरात तो डोलतो
भक्त विठूमय होवून विठ विठु नाम गातो
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल (ताधीन ताधीन ता ता ता)
जरी फाटका संसार तरी मनाने उदार
वारी शिकविते हेच केसा असावा आधार
जिथे हजारो संताची पायधूळ गा चंदन
लावा माथी त्याचा टिळा होई सफल जीवन
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल (ताधीन ताधीन ता ता ता)
सांग आता तरी देवा काय चुकल माझं
कधी पालटेल गाड माझ्या नशीबाच
अ अ सांग आता तरी देवा काय चुकल माझं
कधी पालटेल गाड माझ्या नशीबाच
तुझ्याविना जगण्यात रस नाही राहिला
जळी स्थळी सदासर्वकाळ दिसे तू मला
आता बदल रे डाव पुरे झाला हा खेळ
हे बा विठ्ठल
नाही उरले तुझ्या माझ्यात अंतर
झालो विठूमय अंतरबाह्य विठ्ठल
तुझ्या नामापुढं माझं सारं मी पन सरल
असं नात भक्तीच तुझ माझ जडलं
सारं तुझ्याच स्वाधीन माझ कर सांभाळ
हे बा विठ्ठल (विठ्ठल विठ्ठल विठ्ठल)
हे बा विठ्ठल (विठ्ठल विठ्ठल विठ्ठल)
हे बा विठ्ठल (विठ्ठल विठ्ठल विठ्ठल)
हे बा विठ्ठल (विठ्ठल विठ्ठल विठ्ठल)