तुझ्यात मी स्वप्न माझे पाहताना
शोधतो मी सुखाचा रे किनारा
भासते मखमली, सारे आता...
ओढ का ही हवी हवीशी वाटते जी आपुली
ना कळे कसा गुंततो आता मी
आस का ही बस तुझी...
का खुळे स्वप्न हे तू सांग ना...
अनोळखी विश्वात ही मन रमे का बोल ना
नाही आता माझ्यात मी ,भेटतो तुझ्यात ही जरा
चांदणे अलगद पडे ओंजळीत या आता