गंगा जमुना डोळयात उभ्या का
गंगा जमुना डोळयात उभ्या का
जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा
कडकडुनी तू मिठी मारता बाळे
बालपण आले आले घुमवित घुंगुर वाळे
आठवले सारे सारे गहिवरले डोळे
आठवले सारे सारे गहिवरले डोळे
कढ मायेचे तुला सांगती जा
जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा
दारात उभी राहिली खिलारी जोडी
बघ दिर धाकले बसले खोळंबुन गाडी
पूस ग डोळे या पदराने सावर ही साडी
पूस ग डोळे या पदराने सावर ही साडी
रुप दर्पणी मला ठेवूनी जा
जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा
मोठ्याची तू सून पाटलीण मानाची
हसले तुझे गं हिरवे बिलवर लगीनचुडे
बघू नकोस मागे मागे लाडके बघ पुढे
बघू नकोस मागे मागे लाडके बघ पुढे
नकोस विसरु परि आईला जा
जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा