यश तेची विष झाले
यश तेची विष झाले देहात ते उफाळे
स्फुंदून काय आता जावे मिटून डोळे
स्फुंदून काय आता जावे मिटून डोळे
जावे मिटून डोळे
यश तेची विष झाले
सुमहार वाटला जो तो एक साप काळा
सुमहार वाटला जो तो एक साप काळा
प्रासाद थाटला जो ती बंद बंदिशाळा
त्या बंधनात बांधी माझे मलाच जाळे
स्फुंदून काय आता जावे मिटून डोळे
स्फुंदून काय आता जावे मिटून डोळे
जावे मिटून डोळे
यश तेची विष झाले
हा खेळ संपलासे आता न हारजीत
हा खेळ संपलासे आता न हारजीत
या हुंदक्यात गेले कोंडून प्रेमगीत
माझ्याच काजळाने हे तोंड होय काळे
स्फुंदून काय आता जावे मिटून डोळे
स्फुंदून काय आता जावे मिटून डोळे
जावे मिटून डोळे
यश तेची विष झाले