हे मना
आज कोणी बघ तुला साद घाली
हे मना
आज कोणी बघ तुला साद घाली
जाण रे दाटलेली ही किमया भोवताली
हे मना
हा वारा ताण घेई निर्झरही साथ देई
हा वारा ताण घेई निर्झरही साथ देई
गुणगुणती दिशा दाही
घे जाणून मूक बोली
घे जाणून मूक बोली
हे मना
आज कोणी बघ तुला साद घाली
हे मना
वेद गाती रम्य लाटा फूल फुलवी गंधगाथां
वेद गाती रम्य लाटा फूल फुलवी गंधगाथां
किरण होऊन रे विधाता
लोपवितो रात्र काळी
लोपवितो रात्र काळी
हे मना
आज कोणी बघ तुला साद घाली
हे मना
शोधिसी तू सौख्य़ कोठे जीवनाशी जोड नाते
शोधिसी तू सौख्य़ कोठे जीवनाशी जोड नाते
साठला रे स्वर्ग येथे
राहिली का रिक् त झोळी
राहिली का रिक् त झोळी
हे मना
आज कोणी बघ तुला साद घाली
जाण रे दाटलेली ही किमया भोवताली
हे मना