तुझे सर्वरंगी रूप उदारा
तुझे सर्वरंगी रूप उदारा
कळले सांग कुणाला
खेळ तुझा न्यारा प्रभु रे
खेळ तुझा न्यारा
स्वार्थाभवती दुनिया फिरते
बेईमान ठरते भलाई
बेईमान ठरते
सौद्यासाठी जुळते नाते
सौद्यासाठी जुळते नाते
फसवा भावफुलोरा
खेळ तुझा न्यारा प्रभु रे
खेळ तुझा न्यारा
आशेमधुनी जीवन फुलते
मरणाशी अडते पाऊल
मरणाशी अडते
हे मायावी मृगजळ खोटे
हे मायावी मृगजळ खोटे
उरतो दूर किनारा
खेळ तुझा न्यारा प्रभु रे
खेळ तुझा न्यारा
दोन दिसांची सगळी नाती
दोन दिसांची सगळी नाती
कुणी न उरे अंती सोबती
कुणी न उरे अंती
पैलतीराची हाक ऐकता
पैलतीराची हाक ऐकता
स्मरतो एक सहारा
खेळ तुझा न्यारा प्रभु रे
खेळ तुझा न्यारा