चल ग सखे चल ग सखे पंढरीला
विठुराया वाट पाही
वाट पाहे रखुमाई
जाऊ चल पायी पायी
त्याचे भेटीला
चल ग सखे चल ग सखे
चल ग सखे चल ग सखे पंढरीला(२)
हरिनामात नाहते पंढरी
दुरून दुरून येति ग वारकरी
लाखात देखणी स्वर्गापरी
सावळ्या विठूची नगरी
ह्या जीवाला झाली घाई
विठूकड धाव घेई
जाऊ चल पायी पायी
त्याचे भेटीला
चल ग सखे चल ग सखे
चल ग सखे चल ग सखे पंढरीला (२)
विठुराया...
तुझी छाया...
विठुराया तुझी छाया आम्हावरी
तुझे श्वास तुझी काया कृपा तू करी
तुझ्यात संसार पाहिला
जीव तुझ्यात अडकून राहिला
पाहिला विठू मी सावळा
गुण तुझं टाळ गाई
तिथं वीणा तल्लीन होई
सूर मृडुंगाचाही लागला
चल ग सखे चल ना सखे
चल ग सखे चल ग सखे पंढरीला