[ Featuring ]
बांधते मन हळव्या गाठी
गुंतते जरी नसते हाती
कधी कसे सूर जुळती आणि
भावते मग कुठले कोणी
हरवले जग नकळत सारे
हवेहवेसे कुणीतरी वाटे
सांगना जीव झुरतो कारे
साजना रे साजना रे
साजना रे साजना रे
बांधते मन हळव्या गाठी
गुंतते जरी नसते हाती
कधी कसे सूर जुळती आणि
भावते मग कुठले कोणी
हरवले जग नकळत सारे
हवेहवेसे कुणीतरी वाटे
सांगना जीव झुरतो कारे
साजना रे साजना रे
साजना रे साजना रे
हा गंध आहे तुझा
की छंद लागे तुझा
धुंदावलेल्या स्पंदनाने
भांबावले मी कधी
समजावले मी कधी
नादावलेल्या पावलांना
ऐकुनी साद तू येशील का
साथ जन्मांची देशील का
हात हाती घेऊनि माझा
रंग स्वप्नांना देशील का
अनोळखी जग अवघे होते
उमलुनी मन हळवे गाते
सांगना जीव झुरतो कारे
साजना रे साजना रे
साजना रे साजना रे
कळले मला ना कधी
होऊन गेले तुझी
स्वप्नी तुझे मी रंग ल्याले
एकांत माझा तुझा
का सांग झाला मुका
का भावनांना पंख आले
ओ स्पर्श का रोमांचित झाले
श्वासही गंधाळून गेले
खेळ हा रात्रंदिन चाले
सारखा भासांचा करे
बहरले जरी तनमन सारे
लागली तरी हुरहूर कारे
सांगना जीव झुरतो कारे
साजना रे साजना रे
साजना रे साजना रे